News34 chandrapur
ऊर्जानगर(चंद्रपूर):-चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील श्री गुरुदेव सेवा महिला मंडळीचा सामुहीक हळदीकुंकू कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. सर्वानी प्रथम वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या अधिष्ठानाला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी जेष्ठ सेविका धमाणे यांनी सामूहिक हळदीकुंकू कार्यक्रम घेण्याचे राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतील महत्व सविस्तर पटवून सांगितले.सर्व गुरुदेव महिला सेविकांनी एकमेकांना हळदीकुंकू लावून पारंपरिक भेटवस्तू न देता एक फुलांचे झाड कुंडीसहीत भेट देण्यात आली.
सायंकाळी सामुदायिक प्रार्थना घेऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी मुक्ता पोईनकर यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देऊन सर्वानी शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा महिला मंडळाच्या जेष्ठ सेविका सरस्वता धमाणे, कमल पिदूरकर, इंदूताई वऱ्हाटे तसेच महिला अध्यक्षा सुषमा उगे ,सचिव सविता हेडाऊ, मालू कोंडेकर, मनिषा दुर्गे, मुक्ता पोईनकर,रुपाली चहानकर, कल्पना बगमारे ,सुनंदा कन्नमवार,वैशाली चामाटे,रागिना काळमेघ, शितल पोहनकर, माधुरी दुफारे, संगीता जोगी, सौ वाघ काकू यांची उपस्थिती होती.