News34 chandrapur
चंद्रपूर:- दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या tiger attack वाघांच्या हल्ल्यात सतत कामगार व सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात hunger strike आमरन उपोषण आंदोलनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ पासुन केली आहे.
सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला सर्वसामान्य नागरिकांसह अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले आहे.
विज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती Mahanirmiti ctps चंद्रपूर मधील महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना, सर्बोडीनेट इंजिनिअर्स असोसिएशन, पॉवर फ्रंट युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, असोसिएशन ऑफ केमिस्ट, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य वीज ब. अ. कर्मचारी संघ, ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटना चंद्रपुर या सर्व कामगार संघटनांच्या अध्यक्ष, सचिव व संघटना प्रतिनिधींनी सामूहिकपणे उपोषणास्थळी येऊन पाठींबा असल्याचे संयुक्त पत्र दिले असल्याने निश्चितच या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.
