News34 warora
वरोरा - पती कर्तव्यावर गेल्यानंतर विवाहित महिला आपल्या घरी दुपारी आराम करीत असताना एका विवाहित युवकाने घरात प्रवेश करून छेडखानी केल्याची घटना वरोरा शहरात 19 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. पती घरी आल्यानंतर पती-पत्नीने सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वरोरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर छेडखानी करणाऱ्या विरुद्ध वरोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
Ipc section 354
वरोरा शहरातील विश्वास नगर मध्ये किरायाच्या घरात पती-पत्नी आपल्या दोन महिन्याच्या मुलासह राहते. पत्नी मध्यप्रदेशात नोकरी करते दोन महिन्याचा मुलगा असल्याने ती वरोरा येथे पतीसोबत राहत आहे, 19 फेब्रुवारी रोजी पती सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले. त्यानंतर घर काम करणारी बाई लहान मुलाला घेऊन सकाळी 11 वाजताच्या सुमारास बाहेर अंगणात बसली होती, सदर महिला घरात आराम करीत असताना घर मालकाचा विवाहित मुलगा रुपेश बावणे याने घरात प्रवेश करून आराम करीत असलेल्या महिलेची छेडछाड केली. Molestation of a woman
महिलेने आरडाओरडा केल्याने तो पळून गेला. सदर बाब महिलेने पतीला व छेडछाड करणाऱ्या विवाहित युवकाच्या पत्नी व आईला सांगितली. त्यानंतर पती येताच पती-पत्नीने वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली या तक्रारीवरून रुपेश बावणे याच्याविरुद्ध कलम 354, 451 नुसार वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. sexual molestation
