News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाउंडेशन, आवारपूर हे नजीकच्या गावांची सर्व स्तरातून प्रगती व्हावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असते.या वाढत्या लोकसंख्येमुळे बहुतांश युवक बेरोजगार असतात.
त्यांना कुठेतरी आपल्या कौशल्यावर रोजगार मिळावा यासाठी अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशनने नजीकच्या गावातील 40 युवकांना Vehicle training देण्याचे ठरविले. विशेष म्हणजे त्या युवकांमध्ये 2 मुलींचा समावेश आहे. Driving school
चंद्रपूर ड्रायव्हिंग स्कूल चंद्रपूर यांच्या सहाय्याने या युवकांना वाहन प्रशिक्षण देऊन टी.आर परमनंट ड्रायव्हिंग फोरव्हीलर लायसन्स सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे.प्रशिक्षणाचा शुभारंभ ultratech cement अल्ट्राटेक सिमेंट वर्क्सचे युनिट हेड पी.एस.श्रीराम यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात सौदीप घोष, संदीप देशमुख,कर्नल दिपक डे,आनंद पाठक, प्रशिक्षक उत्तम काळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे, देविदास मांदाळे यांनी परिश्रम घेतले.
