चंद्रपूर/दुर्गापूर - चंद्रपुरात 2 दिवसात वाघ व बिबटच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने दुर्गापूर परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
16 फेब्रुवारीला रात्री 10 वाजताच्या दरम्यान 52 वर्षीय भोजराज मेश्राम या कंत्राटी कामगाराला वाघाने फरफटत नेले, तर गुरुवारी रात्री 10 ते 11 वाजताच्या दरम्यान दुर्गापूर ग्रामपंचायत च्या मागील भागात 16 वर्षीय राज भडके या मुलाला बिबट्याने ओढत त्याची शिकार केली. Leopard kill 16 yrs young boy
2 दिवसात घडलेल्या या घटनेत वनविभाग व पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली, गुरुवारी रात्री पासून वनविभाग व पोलिसांनी राज चा शोध घेतला मात्र त्याचा मृतदेह कुठेच आढळला नाही. Cannibal leopards
शुक्रवारी सकाळपासून पुन्हा राज चा शोध घेण्यात आला असता दुपारी घटनास्थळा पासून 500 मीटर अंतरावर वेकोली च्या भिंतीजवळ राज चा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. Forest chandrapur
राज चा मृत्यू हा वनविभागामुळे झाला असल्याचा आरोप विविध राजकिय पक्षांनी लावला आहे, जर वेळीच वनविभागाने वन्य प्राण्यांना जेरबंद केले असते तर आज दोघांचा बळी गेला नसता. Panic of wild animals
