घुघुस - शहरातील वार्ड क्रमांक 2 बैरम बाबा परिसरात 6 फेब्रुवारीला काही अज्ञातांनी टायर पंचर दुरुस्तीच्या दुकानातील ताला तोडत त्यामधील 74 हजारांचा माल लंपास केला. News34 Ghughus
दुकान मालक 27 वर्षीय मुलकु इलायत अली यांचे टायर पंचर दुरुस्तीचे दुकान असून 6 तारखेला सकाळच्या सुमारास दुकान उघडायला गेले असता दुकानाचा ताला तोडलेल्या अवस्थेत होता.
अली यांनी आत प्रवेश केला असता दुकानातील कम्प्रेसर मशीन की.30 हजार, Bolt मशीन 14 हजार, Heater मशीन 2 हजार, 3 नग जुने टायर सहित 4 नग खाली टायर की. 21 हजार, लोखंडी Disk जुने 3 नग की.3 हजार, एक हातोडी व रॉड असा एकूण 74 हजारांचे साहित्य न आढळल्याने त्यांनी याबाबत घुघुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
घुघुस पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाची चक्रे फिरविली असता घुघुस गांधी चौकातील सीसीटीव्ही चेक केले. Tire puncture repair shop theft
1 इसम हा मोटारसायकल वर तर त्याच्या मागे टाटा एस वाहन जात होते, घटनास्थळी टाटा एस वाहनाच्या टायरचे मार्क आढळून आले होते.
पोलिसांनी एकाला या प्रकरणी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली, पोलिसांनी या प्रकरणी आरोपी 25 वर्षीय शमशाद मंजूर अन्सारी रा. घुघुस, 40 वर्षीय मंजूर शाह दालू शाह रा. गडचिरोली यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक पूसाटे यांच्या मार्गदर्शनात सपोनि टोपले व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.
