News34 Chandrapur
चंद्रपूर: शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूरच्या धस्क्याने अखेर Mseb ला जाग आली. बालाजी वॉर्ड न 2 येथील पोल क्रमांक E/ 287 मागील दोन वर्षांपासून कुजलेल्या अवस्थेमध्ये होता.
यासंदर्भात वॉर्डातील नागरिकांनी प्रभागातील नगरसेवक, मनपा चंद्रपूर, एमएसईबी कार्यालयात निवेदन दिले. परंतु दोन वर्ष होऊनही यासंदर्भात कुठलीही हालचाल झाली नाही. पोलचा बेस हा कुजलेला असून, सदर पोल कधीही पडून अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. फक्त तारांच्या साहाय्याने पोल उभा होता. सदर बाब वॉर्डातील नागरिकांनी शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी सदर जागेची पाहणी करून, खांबाचे फोटो घेऊन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांना निवेदन लिहून ई-मेल, Whatsapp च्या माध्यमातून पाठवून काम ताबडतोब न केल्यास नागरिकांची जीवितहानी,आर्थिक नुकसान होईल अशी माहिती दिली. ना.राज्यमंत्री तनपुरे यांनी सदर गोष्टीची दखल घेऊन तातडीने चंद्रपूर मुख्य अभियंता एमएसईबी देशपांडे यांना सूचना देऊन तात्काळ पाऊल उचलण्यास सांगितले. त्याच अनुषंगाने CE देशपांडे यांनी लगेच दखल घेऊन त्या ठिकाणी जुना पोल काढून नवीन पोल लावण्याचे आदेश दिले. दोन वर्षापासून नागरीक जीव मुठीत घेऊन सदर electric pol पोलच्या सानिध्यात राहत होते, कुठलीही अनुचित घटना घडू शकली असती. परंतु शरद पवार विचार मंचच्या माध्यमातून दोन वर्ष पेंडिंग असलेली समस्या तीन दिवसात निकाली लागली. याबाबतचे मार्गदर्शन Sharad Pawar विचार मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित ढमाळ, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर यांनी केले. याकरिता वार्डातील नागरिकांनी निमेश मानकर जिल्हाध्यक्ष शरद पवार विचार मंच यांचे विशेष आभार मानले. नवीन पोल लावताना याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संजय तूरीले, विजय बोढणे, शालिकराव भोयर, रामटेके, जयपुरकर, कवडु वैद्य, हरिदास ठूणेकर, मनोहरजी जयपुरकर, गोविंदराव बुरडकर, प्रफुल बुरडकर, अशोक उरकुडे, राजू वणस्कर, अंबादास साखरकर, उमेश मानकर उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी निमेश मानकर यांचे आभार मानले.
