चंद्रपूर - मनपा हद्दीतील पाणीपट्टी वसुली सुरु असून, थकीत भरणा त्वरित न केल्यास नळजोडणी बंद करण्याची कारवाई सुरु आहे. झोन क्रमांक ३ अंतर्गत नेताजी चौक बाबुपेठ येथे एका नळधारकाकडे १४ हजार ३०० रुपयांची थकीत होती. मात्र, notice बजावून देखील प्रतिसाद न दिल्याने पथकाने नळजोडणी बंदची कारवाई केली. MNC Chandrapur
शहरात एकूण ३५ हजार नळधारक आहेत. मागील महिनाभरापासून पाणीपट्टी वसुलीची मोहीम जोमाने राबविण्यात येत असून, थकबाकीदारांनी त्वरित भरणा न केल्यास त्यांची नळजोडणी बंद करण्यात येत आहे. थकीत पाणीपट्टी कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक येथील कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १ संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक २ कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३ देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे स्वीकारण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी नळजोडणी बंद होऊ नये, यासाठी पाणीपट्टी भरण्याचे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.
