News34 Ghughus
घुग्गूस : वेकोलीच्या न्यू रेल्वे सायडिंगलाच लागून शालिकराम ही लोकवस्ती आहे.
सायडिंगवर मोठ्या प्रमाणात कोळशा गाडीयाच्या माध्यमातून येत असतो व याठिकाणी कोळश्याची साठवणूक होऊन ती रेल्वे द्वारे इतरत्र पाठविण्यात येते dust pollution
यामुळे याठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कोळश्याची धूळ निर्माण होते व या pollution धुळीमूळे परिसरातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.
ही धूळ नियंत्रणा करिता 24 तास Water Tankar टँकरने पाणी मारण्यात यावे, सायडिंग परिसरात सर्पिक्लर लावण्यात यावे विंडशीट लावण्यात यावे, सरंक्षक भिंत निर्माण करण्यात यावे यासह अन्य मागण्यांना घेवुन 22 फेब्रुवारी रोजी राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम करण्यात आला होता त्या अनुषंगाने आज रेल्वे सायडिंगवर वेकोलोचे सब एरिया मॅनेजर फुल्लारे, काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व नागरिक यांची सामूहिक चर्चा होऊन समस्या निकाली निघाली असून वेकोलीने नागरिका समक्ष संपूर्ण मागण्या मान्य केल्या.
Wcl Ghughus
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,सुकुमार गुंडेटी, रोशन दंतालवार,रोहित डाकूर, विजय माटला,कुमार रुद्रारप,कपिल गोगला,बालकिशन कुळसंगे,राजू शेट्टी, व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
