News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
माणसाने जीवनात केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचा लेखाजोखा देवाकडे असतो.पुण्य व पापांची नोंदणी सतत सुरू असते.शेवटी "जैसे कर्म करेगा,वैसा फल देगा भगवान" असे बोलले जात असून आपण केलेले पुण्य कोणत्या क्षणी व कशाप्रकारे समोर येईल सांगता येत नाही.याचे प्रत्यक्ष दर्शन एका हृदयविदारक घटनेतून घडले. Road Accident
सविस्तर असे की, एक दुचाकीस्वार गडचांदूर वरून अंबुजाकडे जात असताना सुखकर्ता मंगल कार्यालय समोर एका भरधाव वेगाने येणार्या स्कॉर्पिओला वाचविण्याच्या प्रयत्नात एका राख भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.आणि काही अंतरावर ट्रक पलटी झाला.सदर घटना 26 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 1 च्या सुमारास घडली.या घटनेत आश्चर्याची बाब म्हणजे दुचाकी चकनाचूर झाली. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला फेकला गेला.त्याला डोक्यावर किरकोळ जखम असून ट्रक चालक सुद्धा सुखरूप आहे.
या हृदयविदारक व आश्चर्यकारक दूर्घटनेचे स्वरूप पाहता ये-जा करणारे प्रत्यक्षदर्शिंना असे वाटत नव्हते की दुचाकीस्वार सुखरूप व जीवंत असेल.मात्र म्हणतात ना "देव तारी,त्याला कोण मारी" ही म्हण आज याठिकाणी शतप्रतिशत सार्थक ठरली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. "बिचाऱ्याने कोणते पुण्य केले असेल जे आज त्याचे समोर आले" असे आपुलकीचे बोल घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून ऐकायला मिळत होते.घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली असता यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. पंचनामा करून दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली.ट्रक घुग्गुस येथील असल्याची माहिती असून दुचाकीस्वार कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही.
