News34 gadchandur
गडचांदूर :- औद्योगिक शहर गडचांदूर नगरपरिषदेच्या सहाय्य निधीतून शहरातील मध्यभागी असलेल्या पाणीच्या नवीन टाकीचे बांधकाम करण्यात आले.
मात्र टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे व कामात मोठ्याप्रमाणात Corruption भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत याची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी तक्रार नगरपरिषदेत विरोधी नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर,नगरविकास मंत्री,जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विभाग चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
याची जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक दखल घेत जुलै 2021 रोजी एक त्रिसदस्यीय समिती गठित केली. समितीचे पदसिद्ध अधिकारी राजूरा उपविभागीय अधिकारी एस. पी.खलाटे अध्यक्ष तसेच गजानन भोयर मुख्याधिकारी न.प.वरोरा,अरविंद शेरकी कार्यकारी अभियंता महा.जिवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर हे सदस्य म्हणून आहे.उपरोक्त चौकशी समितीने तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मुद्देनिहाय सविस्तर चौकशी करावी व केलेल्या चौकशीचा अहवाल आपले स्वयंस्पष्ट अभीप्रायासह तात्काळ सादर करावा असे आदेश दिले होते.मात्र आज जवळपास 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लोटूनही याप्रकरणी काहिच निकाल लागला नसल्याने सदर प्रकरण थंडबस्त्यात गेल्याची शंका व्यक्त करत "पाणी मुरले तरी कुठे हेच कळेनासे झाले !" अशी भावना यांनी व्यक्त केली आहे.
सदर कामाची कार्यान्वय यंत्रणा ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला देणे गरजेचे होते.मात्र या कामात भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या उद्देशाने सदरचे काम न.प.कडेच ठेवण्यात आले.आणि ज्याला सिव्हिल कामांचा कुठलाही अनुभव नाही अशा मेकॅनिकल इंजिनीअरकडे याच्या देखरेखीचे काम सोपवण्यात आले.परिणामी या नवनिर्मित टाकीत पाणी भरून,केलेल्या टेस्टिंगच्या वेळी याच्या रिंगणातून व स्लॅब मधून पाणी बदबद गळत असल्याचे दृश्य प्रत्यक्ष नागरिकांनी पाहिले.निव्वळ कामात भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या उद्देशाने टाकीचे काम सोपविण्यात आले.तसेच सिव्हिल कामाची एमबी बनविण्याचे अधिकार नसतांनाही यांनी स्वतः वाढीव एमबी बनविली व त्यानुसारच संबंधित ठेकेदाराला आरए बिल दिल्याचे आरोप करत सदर प्रकरणी सखोल चौकशी करावी,दोषी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी या विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती.
------------//---------
(पाणी टाकीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार आम्ही मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.याची सकारात्मक दखल घेत जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी राजूरा, मुख्याधिकारी वरोरा व एमजीपीचे अभियंता यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली होती.मात्र या समितीने अजूनपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे कुठलाही अहवाल सादर केलेला नाही.मी एक आठवड्यापूर्वी डिपीओ साहेबासोबत चर्चा केली असता अहवाल आलेला नाही आम्ही परत रिमाईंडर लेटर त्यांना पाडवू असे त्यांनी सांगितले.येत्या काही दिवसात जर याविषयी चौकशी न केल्यास आम्ही पुठील पाउल उचलू.)
अरविंद डोहे
विरोधी नगरसेवक न.प.गडचांदूर
------------//----------
(टाकीतून पाणी गळतीची दुरूस्त करण्यात आली आहे.चेक करण्यासाठी आम्ही दोन,तीन वेळा पाणी भरून व्यवस्थित पाहणी केली. आमच्याकडून टेस्टिंग झाली असून त्यामध्ये पाणी भरून आहे.थर्ड पार्टी ऑडिट होने बाकी आहे.एमजीपीकडून टेस्टिंग सुद्धा झाली परंतु काही एरियामध्ये खालची पाईपलाईन नवीन टाकायची आहे ती जोडल्यावर टाकीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.)
स्वप्नील पिदूरकर
पाणी पुरवठा विभाग अधिकारी न.प.गडचांदूर.
-------------//---------
