News34 Gadchandur
गडचांदूर :- गडचांदूर शहरवासीयांचे आरोग्य उत्तम रहावे, या काळजीपोटी नगरपरिषदेने शहरातील विविध प्रभागात शुद्ध,स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची फिल्टर आरो मशीन लावली आहे.
यापैकी दोन ठिकाणची आरो मशीन एका सामाजिक संस्था(NGO)ची असून याची संपूर्ण देखरेख संस्थेकडून होते.यापैकी प्रभाग क्रं.1चा Auro नगरपरिषद नगराध्यक्षा व सत्ताधारी पक्षाच्या सभापतींच्या निवासस्थाना पासून अगदी जवळच्या गल्लीत आहे.मात्र ही मशीन मागील तीन दिवसापासून बंद पडल्यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे.बिलाचा भरणा न केल्यामुळे या आरोचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिती असून उन्हाळ्याची चाहूल लागत असताना याठिकाणी उद्भवलेली ही समस्या नागरिकांना अत्यंत त्रासदायक ठरू लागली आहे. लोकांना filter water फिल्टरच्या पाण्याची सवय लावायची आणि अशाप्रकारे तडफडत वाऱ्यावर सोडायचे ही बाब कितपत योग्य अशी जळजळीत भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे एक वर्षापुर्वी आरो लावण्यात आला मात्र अजूनपर्यंत यामध्ये थंड पाण्याची मशीन लावली नसल्याचे कळते. नगरपरिषदेने नागरिकांना होणारा त्रास व गैरसोय दूर करण्याची गरज आहे.मात्र असे होत नसल्याने संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.
-------------//----------
प्रभाग 1 व 5 येथील आरो एका एनजीओने मोफत लावली आणि चालविण्यासाठी एका बचतगटाला दिली आहे.मेंटेनन्सची संपूर्ण जबाबदारी यांची आहे.बील भरले नाही म्हणून याची लाईन कापण्यात आली अशी माहिती मला आजच मिळाली. यांना न.प.कार्यालयात बोलावले आहे.काय प्रकरण आहे याबाबत चर्चा करून चालू करायला लावतो.अशी माहिती नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग अधिकारी स्वप्निल पिदूरकर यांनी News34 ला दिली आहे.
-----------//---------
