News34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - सुंदर शहर स्वच्छ शहर म्हणून गाजावाजा होत असलेल्या मुल नगरातील मुख्य दुभाजक रस्त्यावर इंदिरा कन्व्हेन्ट कडे जाणाऱ्या रस्त्यालगत पटेल यांच्या घरासमोर असलेल्या Speed Breaker संपूर्ण रित्या उखडून गेल्याने त्यावरून दुचाकी, चारचाकी, सायकल च्या वाहतूक धारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. उखडलेल्या स्पीड ब्राकरमुळे अनेकांचा Accident सुद्धा झालेला आहे. तरी देखील दुरुस्तीचा पत्ताच नाही. अनेक दिवसापासून ब्रेकर फुटलेल्या अवस्थेत आहे. ट्रूक सारखी मोठी Heavy traffic जड वाहतूकीने स्पीड ब्रेकर उखडतच जात आहे. त्यामुळे सर्वच वाहतूक धारकांना अडचण निर्माण झालेली आहे. करिता सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन उखडलेल्या स्पीड ब्रेकरची दुरुस्ती करावी अशी मागणी मुल शहर कांग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश फुलझेले यांनी केली आहे.
