News34 Gadchandur
गडचांदूर :- गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 1 मधील काही घरावरून 33 हजार high voltage हाय व्होल्टेजच्या विद्युत तारा गेले आहे.यासाठी लावण्यात आलेले खांब काहींच्या अंगणात उभे आहे.
सुरूवातीला येथे घर नव्हते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी मोठी वसाहत आहे.काही घरांच्या छतावरून अगदी हात पुरेल एवढ्या अंतरावर तार असल्याने धोकादायक बनले असून जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. मागील वर्षी पेंटिंगचे काम करीत असलेल्या एका गरीब कुटुंबाच्या कर्त्या पुरूषाला या ताराचा करंट लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.तसेच दोन महिन्यापूर्वी पल्लवी शुभम पेंढारकर ही 9 महिन्याची गरोदर महिला Pregnant women घरावर कपडे वाळत घालत असताना करंट लागल्याने प्रचंड भाजली,तिने एक हात ही गमवला आहे.हिच्यावर आजपर्यंत चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दोन वेळा शस्त्रक्रिया झाली आहे.अशा परिस्थितीत तीने एक महिन्यापूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.महिलेच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च परवडत नाही आहे. महिलेच्या घराची जर प्रत्यक्ष परिस्थिती बघितली तर कोणाचेही डोळे पाणावल्या शिवाय राहणार नाही. शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल पण सध्याच्या परिस्थितीत या महिलेच्या उपचारासाठी सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनीधी व सुज्ज्ञ नागरिकांनी पुढे येऊन आर्थिक मदत करण्याची गरज आहे.mother
