News34 Gadchandur
गडचांदूर:- भोयगाव,गडचांदूर या रस्त्याच्या कामाला उशीर होत असल्याने या मार्गावर दररोज अपघात होत आहे.काहींनी जीव गमवले तर काहींना कायमचा अपंगत्व आला आहे.
याच बरोबर धळीमुळे मार्ग लगतच्या शेती पिकांचे प्रचंट नुकसान होत आहे. संधगतीने सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामाची गती वाढवावी,काम पुर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा,यामागणीला घेऊन कोरपना तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते,माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात 7 फेब्रुवारी रोजी कवठाळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.यामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.अंदाजे 1 तास रस्ता रोखून धरल्याने वाहनांची रांगच रांग लागली होती.सुट्टी असूनही संबंधित विभागाचे अधिकारी याठिकाणी उपस्थित होते. यावेळी 22 जून 2022 पर्यंत सदर रस्ता पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर व कंत्राटदारांने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला.यावेळी ॲड.वामनराव चटप यांच्या समवेत निलकंठ कोरांगे, मदन सातपुते,बंडू राजूरकर,रवी गोखरे,रत्नाकर चटप, नरेश सातपुते,विजय निखाडे,विकास दिवे, भाऊजी कन्नाके,मिनाथ बोबडे, दिलीप आस्वले, डॉ.हेपट, कब्रेश नगराळा, बबन पिदुरकर, रघुनाथ लोनगाडगे, रवींद्र ठाकरे, विश्वानाथ आसेकर, सुर्यभान पोतराजे, महादेव हलके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्त चोख होता.
