चंद्रपूर - "माझ्याजवळ काम करत नाही तर चंद्रपुरात राहायचं नाही" असे म्हणत जय दुर्गा माँ शक्तीपीठ चे संचालक मन्ना महाराज त्रिवेदी यांनी पुजारी राकेश पांडे याला जबर मारहाण केली.
याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात त्रिवेदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जटपुरा गेट परिसरात स्थापन करण्यात आलेल्या जय दुर्गा माँ शक्तीपीठ मध्ये मागील 13 वर्षांपासून राकेश पांडे हे पुजारी म्हणून काम करतात.
मात्र कमी पगारात घर चालत नसल्याने त्यांनी मंदिर संचालक मन्ना महाराज त्रिवेदी यांच्याकडे पगारवाढीची मागणी केली मात्र त्यांनी ती मान्य केली नाही. Jai Durga Maa Shakti Peeth
या कारणाने पुजारी पांडे यांनी मे 2021 मध्ये काम सोडले, काम सोडायच नाही अशी तंबी त्रिवेदी यांनी दिली होती, जर काम सोडलं तर चंद्रपुरात रहायचं नाही. असे पांडे यांना सांगण्यात आले.
पांडे हे कुटुंबासाहित आपल्या राज्यात परत गेले मात्र तिथे रोजगाराची व्यवस्था न होऊ शकल्याने ते पुन्हा चंद्रपूर शहरात परत आले. Beating the priest
8 फेब्रुवारीला पांडे हे त्रिवेदी यांना भेटले व चुकी झाली म्हणून विनवणी करू लागले, यावर त्रिवेदी यांनी काही न बोलता 10 फेब्रुवारीला पांडे यांना पुन्हा बोलाविले.
त्यावेळी पुजारी पांडे व त्यांच्या पत्नी नीलम पांडे सोबत होत्या, त्रिवेदी यांनी काही न बघता पुजारी पांडे यांना शिवीगाळ करीत आतील रूम मध्ये नेले व तिथे त्यांना चाकूचा धाक दाखवीत तुझे डोळे बाहेर काढतो अशी धमकी देत मारहाण केली.
पुजारी पांडे यांच्या डोक्यावर त्रिवेदी यांनी रॉड ने वार केला, या हल्ल्यात पुजारी पांडे हे रक्तबंबाळ झाले होते. Manna Maharaj
त्यांच्या पत्नी मध्यस्थी करायला गेल्यावर त्यांचाही हाताला चाकू लागला, मारहाणीनंतर त्रिवेदी यांच्यावर पुजारी पांडे यांच्या पत्नीने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
याबाबत पुजारी पांडे यांनी पत्रकार परिषद घेत माझ्यावर झालेल्या अन्यायावर न्याय मिळायला हवा अशी मागणी केली.
पोलिसांनी त्रिवेदि यांच्यावर 324 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला.
