News34 Chandrapur
चंद्रपूर : आधीच सामान्य जनता गरिबी, बेरोजगारी, महागाईने त्रस्त आहे. यावर 2022-23 च्या अर्थसंकल्पात ठोस पावले उचलून सामान्य नागरिकांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी मोदी सरकार देशाला 2047 चे गाजर दाखवत आहे. असे करून सामान्य जनतेची क्रूर थट्टा मोदी सरकार करीत आहे.
या वर्षीच्या Budget india बजेटचा 2047 शी काय संबंध? लोकांना आज, आता आणि ताबडतोब दिलासा हवा. मात्र हे सरकार ह्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. अशी टीका खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली.
लोकसभेत बजेट वरील चर्चेत बोलतांना खासदार बाळू धानोरकर यांनी भारत देश स्वतंत्रतेच्या ७५ व्य वर्षात प्रवेश केल्या बद्दल सरकार अमृत महोत्सव साजरा करीत आहे, एक प्रकारे भारताचा अमृत काळात प्रवेश झाला. बजेट दरवर्षी सादर होते. त्यात मागच्या व चालू वर्षाच्या खर्चाचे नियोजन असते. त्याचा लेखा जोखा जनतेसमोर केंद्रीय अर्थमंत्री सादर करीत असतात मात्र २५ वर्षाचे व्हिजन असलेल्या बजेटचे मूल्यांकन कसे होऊ शकते असा सवाल लोकसभेत त्यांनी उपस्थित केले.
Chandrapur maharashtra
आत्मनिर्भर भारत च्या माध्यमातून प्रोडक्शन इसेंटिव्ह लिंक या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षात १४ विविध क्षेत्रात ६० लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु १०० लाख करोड रुपये पी. एम. गतिशक्ति योजनेत कोणत्याच प्रकारची रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगितले नाही.
त्यासोबतच सन २०१९, २०२०, २०२१ च्या १५ ऑगस्ट रोजी १०० लाख करोड पेक्षा जास्त रुपयांच्या इंफ्राट्रक्चर पोजेक्ट्स च्या उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता. परंतु यांची माहिती अद्याप देशातील नागरिकांना देण्यात आली नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
Budget news
मेरी गो राउंड रेल्वे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मार्गाने जाणारी वर्तुळाकार रेल्वे सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली. ही रेल्वे सुरू केल्यास पूर्व विदर्भातील प्रवाशांना चांगला फायदा होईल, याकडे रेल्वे मंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले होते. ही मागणी त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी यावेळी खासदार धानोरकर यांनी केली.
Congress
केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतेही नवा विचार दिलेला नाही. पुढील २५ वर्षांचे स्वप्न रंगविणार्या या अर्थसंकल्पात वर्तमानासाठी मात्र काहीही विशेष नसल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. Chandrapur news
