NEWS34 Chandrapur
चंद्रपुर : चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपुर द्वारा संचालीत स्थानिक जनता महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेच्या Ph.D. Research Center चे उद्घाटन आज (दि.२) ला करण्यात आले.
संस्थेचे सेक्रेटरी प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांच्या हस्ते या संशोधन केंद्राचे उद्घाटन पार पडले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष तर प्रमुख पाहूणे डॉ. राहुल सावलीकर होते.
डॉ. एम. सुभाष यांनी संशोधन केंद्राच्या महत्वावर प्रकाश टाकला. सोबतच चांदा शिक्षण प्रसारक मंडळ ही पुर्व विदर्भातील सर्वात मोठी Educational Institution आहे. या संस्थे अंतर्गत जनता महाविद्यालय हे स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात सुरु झालेले दुर्गम भागातील उच्च शिक्षण देणारे पहिले महाविद्यालय आहे. या संस्थेत के.जी. पासुन तर पी.जी. पर्यंत व आता संशोधनापर्यंत शैक्षणिक व्यवस्था आहे. विद्यार्थ्याने नर्सरीमधे प्रवेश घेतला की तो संशोधन करुन Doctorate मिळवूनच बाहेर पडेल, अशी शैक्षणिक व्यवस्था संस्थांतर्गत शाखांमधे आहे. या सर्व शैक्षणिक व्यवस्थांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. एम. सुभाष यांनी केले.
संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. एफ. डब्लु. निरंजने यांनी संशोधन केंद्राच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर माहीती दिली. वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. बोढाले यांनी महाविद्यालयीन सोयी सुविधांची माहिती दिली.
संचालन प्रा. डॉ. डी.व्ही. संतोषवार, आभार प्रा. एच. आर. आत्राम यांनी केले.
कार्यक्रमास वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. एस.जी. नरांजे, प्रा. डॉ. रोशन फुलकर, प्रा.गणेश येरगुडे, प्रा. किशोर बोबडे, प्रा. सोनाली सारडा, सुनिल ठवसे, व पीएच. डी. संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
