News34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - आजच्या काळात सर्वाधिक महत्व पैशाला दिले जात असले तरी पैसा काही देव होऊ शकत नाही, परंतु देवपेक्षा कमीही नाही. करिता पैसा उभारण्यासाठी व्यवसाय करणे आवश्यक आहे. असे अमूल्य योग्य मार्गदर्शन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बेंबाळ परिसरातील जनतेसमोर करुन ब्ल्यू रेस्टॉरंट च्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. बेंबाळ येथे दीपक माडर्न राईस मिलच्या आवारात आयोजीत करण्यात आलेल्या व्यवसाय मार्गदर्शन मेळावा व नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या ब्ल्यू रेस्टॉरंट च्या उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खनिज विकास मंडळाचे सदस्य दिनेश पा. चिटनूरवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, सावलीचे सभापती शिवराज शेरकी, मुलचे माजी सभापती दशरथ वाकुडकर, माजी जी. प. सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे, सरपंच करुणा उराडे, हिमानी वाकुडकर, माजी प्राचार्य नत्थुपाटील आरेकर, पोंभुरणा उपसभापती वासुदेव पा. पाल, कांग्रेस ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, नगर सेविका लीना फुलझेले, महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, प्रसिद्ध व्यावसाईक हसन वाढई, सरपंच प्रदीप वाढई, जालिंदर बांगरे, कोसंबी सरपंच रवींद्र कामडी, तांदाळा उपसरपंच राहुल मुरकुटे, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ वाढई, त्रिमूर्ती नाहगमकर आदी अन्यवर मंचावर उपस्थित होते. कुठलाही व्यवसाय करण्यासाठी ज्ञान,मेहनत आणि पैसा महत्वाचा असल्याचे दिनेश चिटनुरवर यांनी आपले विचार व्यक्त केले. तर शेती पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी मसाला पिकांची लागवड करावी असे सांगितले. तर भाऊंच्या नेतृत्वात cdcc बँकेने राजीव गांधी स्वावलंबन योजना राबवून अनेक युवकांना कर्ज पुरवठा करुन व्यवसाय करीत आहेत. ग्रामीण जनतेनी याचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्ल्यू रेस्टॉरंटचे संचालक दीपक पाटील वाढई यांनी केले. संचालन प्रशांत उराडे यांनी केले तर आभार योगेश शेरकी यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
