चंद्रपूर - पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भाजपा महानगरच्यावतीने शास्त्रीनगर प्रभाग क्र.02 येथील नागरिकांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन संताजी जगनाडे महाराज सभागृहात 11 फेब्रुवारीला करण्यात आले.
News34 chandrapur
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार,भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती संदीप आवारी,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,गटनेत्या जयश्री जुमडे,नगरसेवक शीतल गुरनुले,वनिता डुकरे, वंदना जांभूळकर,प्रदीप किरमे,अनुराधा हजारे,मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,विठ्ठलराव डुकरे,संदीप आगलावे, दिनकर सोमलकर,उमेश आष्ठनकर,रमेश भुते यश बांगडे यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रारंभी आ.सुधीर मुनगंटीवार व डॉ गुलवाडे याचे हस्ते संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. Chandrapur news
यावेळी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.04 च्या 13 व इंदिरानगर आरोग्य केंद्र 01 च्या 14 कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.यात डॉक्टर,परिचारिका व अशावर्करचा समावेश होता,तर नेहरू नगर वार्ड येथील 11 जेष्ठ नागरिकांचा senior citizen आ.मुनगंटीवार यांचे हस्ते शाल,श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.निरोगी आरोग्यसाठी 3 वर्षापासून निशुल्क प्रशिक्षण देणाऱ्या 28 योगनृत्य शिक्षकांना देखील गौरविण्यात आले.
या प्रसंगी किमान 105 नागरिकांनी भाजपाचा दुपट्टा,विकासगाथा व टोपी प्रदान करून भाजपात प्रवेश देण्यात आला.यात प्रामुख्याने शंकरराव भट, मंजुषा लेडांगे,शंकर घुसे,देवेंद्र राजूरकर,रेणुका कोल्हे, गंगाधर भोयर,सुनीता गुज्जनवार,मनीषा आसुटकर, विजया करंडे,सुनीता सरोदे,कविता भट, कुमार घोडमारे,जाहिदा पठाण,अफसान पठाण, रकिया पठाण यांचा समावेश होता.या प्रसंगी पं.दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश आष्ठनकर यांनी तर संचालन किरण बुटले यांनी केले. रमेश भुते यांनी आभार मानले.या प्रसंगी संताजी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले. कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
शेवटच्या माणसाची सेवा करा...आ.मुनगंटीवार
पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानववादाची देशाला आज गरज आहे.तो घराघरात पोहोचविणे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची जवाबदारी आहे.शेवटच्या माणसाची सेवा हेच आमचे उद्दिष्ठ असून निःस्वार्थ भावनेने त्याची सेवा करा,असे आवाहन आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.यावेळी महापौर कंचर्लावार व जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.