News34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या नफ्यामधून केवळ शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी शेतकरी व त्यांचे कुटुंबीय यांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना हिम्मत देणे हेच CDCC बँकेचे कर्तव्य समजून बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बेंबाळ येथील चेतन भारत वाळके याला दुर्धर आजार झाल्याने CDCC बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून मदतीचा चेक चेतन वाळके या रुग्णाला उपचारासाठी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते देण्यात आला.याप्रसंगी तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर, मुल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, ग्रामीण कांग्रेस नेते दीपक पाटील वाढई, बेंबाळ सरपंच करूनताई उराडे, पं.स.माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, नांदगाव सरपंच हिमानी वाकुडकर, सामाजिक कार्यकर्ते गुरु गुरनुले, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, नितीन मोहूर्ले, चांगदेव केमेकार, ईस्तरी चिल्लरवार, किशोर पगडपल्लीवार, त्रिमूर्ती नाहगमकर, दामोदर देशमुख, यांचेसह बेंबाळ येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मदतीची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी बँकेचे सूत्रं हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक बदल केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी एकमेव बँक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या बँकेला मिळालेल्या आर्थिक नफ्यातून धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कँसर cancer सारखे दुर्धर आजार झाल्याने शेतकरी खचतो म्हणून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तात्काळ उपचारासाठी आर्थिक financial help मदत देऊन रुग्णाला व त्यांच्या कुटुंबीयांना पुनर्जीवित करण्याचे कार्य करीत असल्याने शेतकरी व कुटुंबियांनी संतोषसिंह रावत व बँकेचे आणि समस्त संचालक मंडळांचे बेंबाळ वासीयांनी आभार मानले आहे.
