News34 Korpana
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना येथे नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले "मोबीन बेग" यांची पक्षाने नुकतीच तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. Congress
बेग अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असून या अगोदर हे राकाँमध्ये minority city president अल्पसंख्याक शहराध्यक्ष पदी विराजमान होते. Congress सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाण असणारे व युवकांचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले बेग यांनी क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्व व विजय बावने यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शेकडो युवक कार्यकर्त्यांसह काँग्रेस मध्ये प्रवेश केला. "कोणत्याही पदाची लालसा न ठेवता सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करण्याचा मानस होता. मात्र पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून ऐवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे.वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहयोगाने सर्वसामान्य जनता व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निस्वार्थपणे काम करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत नवनियुक्त युकाँ IYC तालुका उपाध्यक्ष "मोबीन बेग" यांनी सदर प्रतिनिधी समोर व्यक्त केले असून जबाबदारी दिल्याबद्दल पक्षाच्या समस्त वरिष्ठांचे आभार मानले आहे.
