News34 Chandrapur
चंद्रपूर :- शहरातील बाबूपेठ परिसरातील जुनोना चौकातील नागरिकांना व व्यावसायिकांना मुत्रीघराची व्यवस्था नसल्याने वारंवार चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाला निवेदनामार्फत मागणी केली होती.
परंतु मनपा कडून उडवा उडविचे उत्तर मिळायचे त्यामुळे स्थानिक दुकानदारांनी पैसे गोळा करून नालीवर तात्पुरते मुत्रीघर बनवले.Local citizen initiative
जुनोना चौक बाबूपेठ भागातील सर्वात वर्दळीचे ठिकाण आहे, रोज सकाळी येथे आजूबाजूच्या खेड्यातील शेतकरी येथे भाजीपाला विक्रीस येतात, येथे मोठा बाजार भरला जातो. तसेच पोंभुरणा पासून विध्यार्थी- विद्यार्थीनी येथून ये-जा करतात, या भागात साधारण 100 च्या वर छोटे मोठे दुकाने आहेत अश्या स्थीतीत महिला-पुरुषांना स्वच्छतागृहाची गरज आहे, स्थानिक व्यावसायिकांनी मनपा प्रशासनाला निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली परंतु मनपा ने दुर्लक्ष केले, त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी स्वखर्चाने पडदा बांधून तात्पुरत्या मुत्रीघराची व्यवस्था केली.
Urinal
आतातरी मनपा प्रशासनाने जुनोना चौकात तात्काळ मुत्रीघर बांधून समस्या सोडवावी अशी मागणी स्थानिक व्यवसायिकांनी केली आहे.
मुत्रीघराचे फिती कापून उदघाटन सुद्धा करण्यात आले. Indifferent Chandrapur Municipal Corporation
यावेळी मनीष राऊत, रमेश निखारे, अशोक उराडे, नरेश राऊत, ईश्वर वसाके, महेश निखारे, जावेद शेख, प्रकाश गांगरेड्डीवार व इतर स्थानिक व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.
