चंद्रपूर - ३ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेत पीडिता ४० टक्के भाजली होती. त्यानंतर तिच्यावर नागपूरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. Vikki Nagrale
पीडिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता ३ फेब्रुवारीला २०२० ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. पीडिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवले. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले होते. hinganghat burning case
३ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेत पीडिता ४० टक्के भाजली होती. त्यानंतर तिच्यावर नागपूरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. hinganghat verdict
या प्रकरणात पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजच्या केवळ १९ दिवसातच ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात एकूण ६४ सुनावणी घेत २९ साक्षीदरांचे प्रत्यक्ष जबाब नोंदविण्यात आले आहे.
अंकिताला जाऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे तिला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मरेपर्यंत जन्मठेप होते. न्यायालयाने हे देखील सांगितलं आहे की आरोपी विकेशला 3 फेब्रुवारीला अटक झाली होती. तरी हा दोन वर्षाचा काळ त्या शिक्षेत गृहित धरला जाणार नाही. त्याला आजपासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगायची आहे. त्याचप्रमाणे 5 हजार रुपये दंडही त्याला द्यायचा आहे.
हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली असली तरी त्याला फाशी ची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूरची वैष्णवी आंबट्कर या मुलीला आजही न्यायाची प्रतीक्षा आहे, ९ सप्टेंबरला वैष्णवी वर युवकाने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर चाकूने वार केले होते, गाम्भी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र १२ सप्टेंबरला वैष्णवी चा मृत्यू झाला होता.
वैष्णवी चा आरोपी प्रफुल आत्राम ला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली होती, आजही या प्रकरणात न्याय व्हायचा आहे. vaishnavi ambatkar Waiting for justice
वैष्णवी हि कुटुंबात मोठी होती, खाजगी दवाखान्यात काम करून ती आपल्या कुटुंबाचा गाळा चालवीत होती. fast track court
१ सप्टेंबरला आरोपी प्रफुल आत्राम ने तिला दवाखान्यात जाऊन तुला सोडणार नाही अशी धमकीही दिली होती, याबाबत पोलीस तक्रार झाली मात्र पोलिसांच्या उदासीनतेमुळे कारवाई झालीच नाही. पोलिसांच्या निष्काळजीपणाचा वैष्णवी बळी ठरली.
सदर प्रकरणही महाराष्ट्रात चांगलंच गाजलं मात्र या प्रकरणात मृतक वैष्णवीचे आई वडील न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
वैष्णवी च्या वडिलाला चंद्रपूर महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने नोकरीचे आश्वासन देण्यात आले मात्र अजूनही ते आश्वासन पूर्ण झाले नाही.
चंद्रपूरच्या वैष्णवीला न्याय कधी मिळणार? याची वाट आज चंद्रपूरकर बघत आहे.
