News34 Mul
मूल (गुरू गुरनुले)
शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची Bank म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यममातून राबविण्यात येत असलेल्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत येरगाव येथील शेतकरी संजय पतरुजी गालपल्लीवर यांचा लहान मुलगा तृप गालपेल्लीवर याला snake bite सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्यामुळे संजयचा कुटुंब निराधार झाल्याचे बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना कळताच तात्काळ बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून Financial help मंजूर करुन गालपेल्लीवर कुटुंबाला आधार दिला.
मदतीचा चेक येरगाव येथे त्यांचे घरी प्रत्यक्ष भेट देवुन मदतीचा Check मृत मुलाच्या वडिलांना सुपुर्द केला. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखिल गँगरेड्डीवार, कांग्रेस किसान सेलचे अध्यक्ष रुमदेव गोहणे, सरपंच सौ.प्रतिभा जुमनाके, माजी सरपंच संजय फुलझेले, सदस्य सचिन नागपुरे, जेष्ठ कार्यकर्ते कपूरदासजी गेडाम, गणेश तोडसे, बापूजी कोडापे आदी येरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. निराधार झालेल्या कुटुंबियांना बँकेने आर्थिक आधार दिल्याबद्दल मृतक मुलाच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व समस्त संचालक मंडळाचे आभार मानले.
