News34 Ballarpur
विसापूर - नांदगाव बल्लारपूर या गावाची शेतजमीन SUN FLAG IRON & STEEL CO. LTD या कंपनीला शेतजमीन आवंटन झालेली आहेत आणि मागील चार ( 4 ) महिन्या पासून या कंपनीचा सर्वे करणे चालू आहेत. शेतजमिनीचा सर्वे करण्याची कंपनी कडून विसापूर ग्रामपंचायतीला एक पत्र देण्यात आले होते.
विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्या परवानगीने गेल्या चार ( 4 ) महिन्यापासून सतत सर्वे चालू होता. पण याची माहिती विसापूर गावातील कोणत्याही शेतकऱ्याला व नागरिकांना देण्यात आली नाही याचे कारण विचारण्यासाठी व का बरं शेतकऱ्याचा एवढ्या जिवाभावाचा महत्वाचा विषय लपवून ठेवण्यात आला याचा जाब विचारण्यासाठी विसापूर गावातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायती वरती धडक मोर्चा काढण्यात आला. या समोर लवकरात लवकर सरपंच उपसरपंच यांनी कंपनीशी संवाद साधून त्यांना विसापूर गावात बोलावून त्यांचा काय अजेंडा आहेत हे विचारावे.
(1) जमीन कुठून कुठं पर्यंत घेणार आहेत
(2) किती एकर जमीन घेणार आहेत
(3) प्रत्येकी एकराला किती रुपये भाव देणार आहेत
(4) जमीन धारकांना व गावातील बेरोजगार लोकांना कंपनीत नोकरीला घेणार की नाही
(5) या कंपनीचा अजून विसापूर गावातील नागरिकांना काय फायदा होईल याची
सम्पूर्ण माहिती घेऊन यावे डायरेक्ट खुल्या मैदानात गावकरी लोकांशी संवाद साधायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. असे अनेक मुद्यांवर्ती ग्रामपंचायत विसापूर वरती मोर्च्या काढण्यात आला व कोणत्याही नेत्याच्या दबावात न येता हे पारदर्शक काम करावे जर या समोर अशी चूक लक्षात येतांनी दिसली तर या पेक्षाही मोठं शेतकरी लोक जमा होऊन ग्रामपंचायतीच्या विरोधात मोर्च्या काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन उचित कारवाही करायला भाग करणार या मोर्च्याला प्रामुख्याने विसापूर गावातील शेतकरी, शेतमजूर सुरज टोमटे, सुर्या अडबाले, प्रदीप गेडाम, गजानन भाऊ पाटणकर, प्रीतम भाऊ पाटणकर व असे अनेक गावकरी हजर होते.
