News34 chandrapur
चंद्रपूर - कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण-महाकृषि उर्जा धोरण २०२० अंतर्गत कृषिपंपधारकांना वीजबिलात सवलत देण्याच्या योजनेतून चंद्रपूर परिमंडलातील– चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयाचा समावेश असणा-या चंद्रपूर, वरोरा, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, गडरिोली व आलापल्ली विभागातील आजापर्यंत एकंदरीत ४२ हजार ७९६ कृषिपंप ग्राहकांनी (ऑक्टोबर २०२०पासून) पासून ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा करीत थकबाकीमुक्तिच्या दिशेने पाउुले टाकत तर २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी २१कोटी ३ लाखाचा भरणा करत आपले वीजबिल कोरे करुन घेतले.
योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरुन संपुर्णपणे थकबाकीमुक्त होण्याची संधी मा. उर्जामंत्री डॉ. श्री. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या योजनेतून कृषिपंपधारकांना उपलब्ध झाली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या कृषि आकस्मिक निधी म्हणून एकंदरीत वीजबिलाच्या ४४ कोटी ५० (एप्रिल २०२० पासून) लाखाच्या रक्कमेतून ६६ टक्के म्हणजे एकूण २९ कोटी ३७ लाख हे कृषिग्राहकांच्या चंद्रपूर आणि गडचिरेाली जिल्हयातील जिल्हयात मुलभूत सुविधा उपलब्ध झाले अशा या नाविण्यपूर्ण योजनेमधून कृषिपंपधारकांचेच भले झाले आहे.
Msedcl chandrapur
त्यांच्या हिताच्या दृष्टीने १ हजार२७१ विविध पायाभूत कामांसाठी १४ कोटी ४० लाखांचे अंदाजपत्रके मंजूर करण्यात आली आहेत तसेच १ हजार १७८ कामांसाठी ६ कोटींचे work order निर्गमित करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावरील उपलब्ध निधीतून सुमारे ८ कोटीची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच कार्यादेश देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने नवीन रोहित्रे बसविणे, नवीन वीजजोडण्या देणे, नवीन अतिरीक्त रोहित्रे बसविणे ई. कामांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ हजार ३४६ कृषिग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहेत.
मूल तालुक्यात भेजगाव येथे नवीन ३३/११ किव्हो उपकेंद्र निर्माण करण्यास(अपेक्षित खर्च -४ कोटी ३३ लाख) हिरवी झेंडी मिळाली असून त्यासंदर्भात निविदा प्रक्रिया पार पडली आहे. तसेच ३३/११ किव्हो जीवती उपकेंद्रास ३३ किव्हो पर्यायी वीजपुरवठा होण्यासाठी उच्चदाब वनसडी ते ३३/११ किव्हो जीवती उपकेंद्रापर्यंत वाहिणी टाकण्यासाठी ३ लाख २४ हजार अंदाजीत खर्च असलेल्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. असे एकंदरीत २० कोटी ४० लाखंच्या कामांचे नियोजन झाले असून शेतकरी बांधवांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.
Agricultural pump holder जसजसे थकबाकीमुक्त होत जातील तसतसे त्यांच्या जिल्हाच्या व गावांच्या विकासाचे ते मानकरी ठरणार आहेत. कृषिपंप Power connection धोरण-महाकृषि उर्जा धोरण २०२० या कधी नव्हे तशा नाविण्यपूर्ण योजनेमधून चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हातील कृषिपंपधारक ग्राहकांना एकीकडे थकबाकी मुक्त होण्याची संधी तर दुसरीकडे त्यांच्या हस्ते त्यांच्या जिल्हयांचा व गावांचा विकास साधला जाण्याचे महत्वाचे सत्कार्य घडणार आहे. ३१ मार्च २०२२ पूर्वी थकबाकी व वीजबिलामध्ये ५० टक्के माफी मिळविण्याच्या या संधीचा लाभ घेवून कृषिपंपधारकांनी थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
