News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नाम.छगन भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हा समता परिषदेच्या वतीने मुल येथील वॉर्ड नंबर १४ मध्ये श्री.प्रा.विजय लोनबले यांच्या आवारात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन जेष्ठ नागरिक नामदेवराव गावतुरे, रयत पतसंस्थेचे अध्यक्ष निमचंद शेरकी,माजी सेवानिवृत्त प्राचार्य गजाननराव नागपुरे, हरीश रायपुरे सौ.कुसुमताई रणदिवे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले,माळी महासंघाचे विभागीय सचिव गुरु गुरनुले यांचे हस्ते करण्यात आले असून उपस्थित अनेक नागरिक व महिलांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. रयतेचे राजे शिवाजी महाराज व क्रांती सूर्य महात्मा फुले यांचे समाज उत्थानासाठी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती रयत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष निमचंद शेरकी यांनी सांगितली. पत्रकार संघाचे सचिव गंगाधर कुणघडकर, सौ. खोब्रागडे शिक्षिका यांनीही शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीवर प्रकाश टाकला तर सौ. कविता संगोजवर यांनी शिवाजी महाराज यांच्यावर स्वरचित उत्कृष्ट कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर CDCD बँकेचे अध्यक्ष श्री.संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते प्रकाशित झालेल्या दिनदर्शिकेचे वाटप मान्यवरांच्या हस्ते सर्व उपस्थित बांधवांना व महिलांना करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा.गुलाब मोरे, श्रावनजी लोनबले, प्रा.सागर मासिरकर, प्रा.रवी बुरांडे, ,प्रा.धंनजय चुदरी,देवराव ढवस, खोब्रागडे सर, प्रशांत भरतकर, ज्ञानेशवर सेगोकर, श्री.संगोजवार साहेब, CDCC Bank चे मुल शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरे, परशुराम शेंडे, राकेश मोहूर्ले, थामदेव रामटेके, प्रकाश सावरकर, महिलांमध्ये सुमन लोनबले, कुसुम रणदिवे,माधुरी गुरनुले, अर्चना चावरे, जयाताई ढवस, सौ.दर्शना निकुरे,सीमा लोनबले, यांचेसह बहुजन समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन समता परिषदेचे सल्लागार युवराज चावरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माळी महासंघाचे सचिव गुरु गुरनुले यांनी मानले. याप्रसंगी माळी महासंघाचेही कॅलेंडर देण्यात आले.
