चंद्रपूर - तालुक्यातील देवाडा (हिंगनाळा) गट ग्रामपंचायत मध्ये दारु दुकान सुरू करण्याचा विषय चांगलाच तापला आहे.
जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीने ठराव घेत व महिलांनी दारूबंदी करावी अशी मागणी करीत वर्ष 2015 ला चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आला होता.
7 वर्षानंतर Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर व वाढती गुन्हेगारी लक्षात घेता वर्ष 2021 ला चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्यात आली.
जिल्ह्यात विविध ठिकाणी दारू दुकानाचे स्थलांतर प्रक्रिया सुरू आहे मात्र काही ठिकाणी या प्रक्रियेला विरोध होत आहे. Start a liquor store
कल्याण ठाणे येथील विनोद केणे यांच्या देशी दारू दुकानाला लागणारी ग्राम पंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने थेट गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत NOC नाहरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केली.
इतकेच नव्हे तर या मागणीला गावातील महिलांचे समर्थन प्राप्त आहे.
गावातील महिला म्हणतात की सध्या देवाडा येथे घरोघरी अवैध दारू मिळत आहे, त्यावर ग्रामपंचायत गप्प आहे, Duplicate Alcohol नकली दारूमुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून त्याला पर्याय म्हणत वैध दारू दुकान सुरू करण्यात यावे.
जेणेकरून ग्रामपंचायत कार्यालयाला महसूल मिळेल व गावातील महिला व पुरुषांना रोजगार ही प्राप्त होणार.
सरपंच व सचिवांनी यावर विचार करीत नाहरकत प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी महिलांनी यावेळी केली.
यासह परिसरातील 3 गावातील नागरिकांनी दारू दुकान सुरू करावे या मागणीला आपले समर्थन दिले आहे.