चंद्रपूर - शहरातील बाबूपेठ व लालपेठ हा भाग दलित वस्ती अंतर्गत येत असल्याने मागील 4 वर्षांपासून या भागातील एकही रस्ते न बनल्याने रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले आहे.
ऐन चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या तोंडावर पालिका व प्रशासनाला जाग येत दलित वस्ती निधी चा वापर करीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्गाचं डांबरीकरण करण्यात आले मात्र बागला चौक ते जंगम बस्ती लालपेठ हा मार्ग तसाच ठेवण्यात आला.
प्रशासन व स्थानिक नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे 30 वर्षीय युवकाला आपले प्राण गमवावे लागले.
2 जानेवारी ला रात्री 10.30 वाजताच्या सुमारास नांदगाव मायन्स क्वार्टर येथे राहणारा 30 वर्षीय युवक राहुल ओमप्रकाश नायक हा Vehicle दुचाकीने घरी जात होता मात्र रस्त्यावरील खड्डे चुकवीत असताना वाहनावरून त्याचा तोल गेला व वाहन दुभाजकावर आदळले. Road
वाहन दुभाजकावर आदळल्याने राहुल चा जागीच मृत्यू झाला. Dimensions
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला.
सदर प्रभागात सत्ताधारी भाजप पक्षाचे नगरसेवक आहे मात्र गेल्या 4.5 वर्षात फक्त आपल्या घराजवळील नाले व रस्त्यांच्या बांधकामाव्यतिरिक्त इतर महत्वाचे कामे त्यांनी टाळले, लालपेठ येथे राहणारे नगरसेवक श्याम कनकम त्या भागात राहतात मात्र त्यांनी हा मार्ग तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा यासाठी काही प्रयत्न केले नसल्याने आज त्या युवकाला आपले प्राण गमवावे लागले.
