प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर : टोल वाचविण्यासाठी अनेक जड वाहन बल्लारपूर नांदगाव मार्गे विसापूर येथून जात असतात. असेच एक सिमेंट भरलेले वाहन विसापूर जवळ रोड लगतच्या नथ्थू टोंगे यांच्या शेतात शनिवारला पहाटे १-३० वा चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटला.
बल्लारपूर - नांदगाव रोड जड वाहतुकीसाठी नसून सुध्दा टोल विरहित असल्याने या मार्गाने अनेक जड वाहने ये जा करीत असतात.याच मार्गावरून सिमेंट भरलेला ट्रक एम.एच.३४ ए.बी. ३९४७ शनिवारला पहाटे बल्लारपूर वरून चंद्रपूरला जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनेक दिवसापासून ग्रामपंचायतीने नाली बांधकामाची माती बाजूला टाकून ठेवल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यातून वाहन चालकांना वाहन काढताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. यामुळेच हा अपघात घडला असावा असे घटना स्थळावरील परिस्थिती पाहिली असता दिसून येते. तरीही जोखीम पत्करून निव्वळ toll tax टोल वाचविण्याचा नादात अनेक जड वाहन चालक जोखीम पत्करून याच मार्गे आवागमन करीत असतात यामुळे भविष्यात मोठी Accident दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून ग्राम प्रशासनाने तात्काळ हे मातीचे ढिगारे उचलावे व मार्ग मोकळा करावावा व जड वाहतुकीला प्रतिबंध घालावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.
अनेक वर्षांपासून विसापुरातील पुर बुडीत क्षेत्रात गावातील सांड पाणी साचून राहत आहे. बाजूच्या शेतकऱ्यांनी पाणी जाण्यापासून रोखल्याने हे पाणी काढण्यासाठी ग्राम प्रशासनाने नालीचे खोद काम केले व मातीचे ढिगारे उचल्यांची प्रक्रिया केली परंतु जि. प. बांधकाम विभागाच्या एका अभियंताने सदर ठीगरे उचल्याची मनाई केल्याने व पाणी काढण्यासाठी ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन चुकल्याने व वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्याच्या बघा च्या भूमिकेने ही समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे व या परिसरात अपघात होण्याच्या घटनाही वाढल्या आहे.