चिमुर :- संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने सध्या काही लोकांचा गोरखधंदा सुरु झाला असून निराधार व्यक्तिनची केस बनविन्याच्या नावाखाली दलाल सक्रिय झाले असून नागरिकांनी सावध राहावे असे आव्हान संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी नागरिकांना केले आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana
केंद्र शाषन व राज्य शासनाने विधवा, अपंग, वृद्, नागरिकांना मदत म्हणून तहसील कार्यालयांच्या माध्यमातून विविध योजना काढल्या असून या योजनेच्या माध्यमातून गरजवंताना एक हजार रुपये प्रति महीना मानधन दिल्या जाते, प्रत्येक महिन्याच्या बैठकीमधे पात्र लाभार्थयाना संजय गांधी निराधार समितिच्या बैठकीत मंजूरी प्रदान करण्यात येत असून समितीचे अध्यक्ष संजय डोंगरे यांचे अध्यक्षते खाली सर्व सदस्य जास्तीत जास्त लाभार्थियांना लाभ करुण देण्याच्या प्रयत्न करीत असतात, पन या योजनेच्या नावाखाली काही Broaker दलाल सक्रिय झाले असून या मधे खाजगी दलालासोबत महसूल विभागातील काही कोतवाल सुद्धा सामिल झाले आहेत, लाभ देण्याच्या नावा खाली केसेस बनविण्याकरीता हजार ते दोन हजार रुपये घेतात व अपात्र असतानासुधा पात्र दाखविन्याचे प्रकार सर्रासपणे सुरु झाले आहेत, अश्या दलालांपासून सावध राहण्याचे आव्हान संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा shivsena शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी नागरिकांना केले आहे, गरजु लाभार्थियाकड़ूंन अतिरिक्त पैसे उकळन्याचा प्रयत्न कैलास शिवसेना पद्यतिने समज देऊ असा इशारासुधा यावेळी देण्यात आला.