चंद्रपूर - चंद्रपूर मनपा अंतर्गत शहरातील पाण्याची समस्या कायमची सुटावी यासाठी अमृत योजना सुरू करण्यात आली.
अमृत योजनेचे उदघाटन झाले अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले मात्र ते पूर्वरत केले नसल्याने अमृत च्या कंत्राटदाराने रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट केली. Road was stolen
तुकूम प्रभाग क्रमांक 1 मध्ये महेशनगर भागातील रस्ता पूर्णतः नादुरुस्त झाल्याने नागरिकांनी रस्ता बनविण्याची मागणी केली, रस्त्याचे कंत्राट निघाले मंजूरही झाले मात्र काम काही सुरू झाले नाही.
आता चंद्रपूर मनपाची निवडणुक तोंडावर आली असताना रस्ता बनणार का यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. Chandrapur municipal corporation
मात्र महेशनगर भागांतील 50 मीटर लांबीचा रस्ताचं चोरीला गेला असल्याचे फलक लावण्यात आले आहे.
यासाठी भाजप नगरसेवकांचा जाहीर निषेध असा मजकूर ही त्या फलकात करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे सुभाष कासनगोट्टूवार, शिला चव्हाण, अनिल फुलझेले व माया उईके हे नगरसेवक आहे, मात्र प्रभाग आजही उपेक्षित असल्याचे चित्र प्रभागात आहे, आता त्यावर भर म्हणजे प्रभागात लावण्यात आलेला फलक, या फ्लकाने नगरसेवकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे, "आमचा रस्ता आम्हाला परत द्या" अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
