प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल : -सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, संसारिक, वैचारिक, साहित्यिक व मानवतावादी अशा विविध कार्याचा प्रत्येक स्त्रीने अभ्यास आणि विचारमंथन करून आपल्या आणि इतरांच्या जीवनात आमूलाग्र बदल, परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनोभावे कृतिशील प्रयत्न करणे गजरेचे असल्याचे प्रतिपादन कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी विद्यार्थ्यांसमोर मत व्यक्त केले. कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तर्फे आयोजित केलेल्या क्रांतीज्योती Savitribai fule सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्य कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दिनेश बनकर प्रा.इस्तारी पडोळे, यांनीही सावित्री बाईंच्या रचनात्मक कार्याची माहिती समजावून सांगतांना आपले व्यक्तिमत्व घडवावे असे मार्गदर्शन केले .विद्यार्थ्यांमधून कु. रीना यापाकुलवार, कु.मोहूर्ले, अविनाश चाहरे यांनीही सावित्री व महात्मा फुले यांनी शिक्षणाचे दार खुले केले नसते तर कदाचित आम्हाला इथे बसण्याची आणि मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली नसती ही त्यांचीच पुण्याई असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला असंख्य विद्यार्थ्यांसमवेत प्रा. सिकंदर लेनगुरे, प्रा.सागर मासिरकर, प्रा. निखिल दहिवले, प्रा.शेलेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राहुल बोधे यांनी केले तर आभार प्रा. एस. सी.चन्ने यांनी मानले.