चंद्रपूर - वन संपत्तीने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्य जीव संघर्षाच्या घटनेत वाढ झाली आहे.
कधी वाघाची शिकार तर कधी नैसर्गिक मृत्यू मात्र यामध्ये वनविभाग आडमुठी भूमिका घेत काहींवर अमानुषपणे मारहाण ही करीत आहे.
सध्या वनविभागातील अतिक्रमण चा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. Chandrapur forest department
वनविभागाच्या कारवाईत नेहमी लोकांना भडकवीत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे काम वंचित बहुजन आघाडीचे राजू झोडे यांनी प्रयत्न केला या कृत्यामुळे वनविभागावर चांगलीच नामुष्की ओढावली असून राजू झोडे यांचेवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन महाराष्ट्र, चंद्रपूर वनवृत्त या संघटनेने केली आहे.
31 डिसेंम्बरला भारत कोवे हा वाघाची शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता मात्र कोवे हा मृतावस्थेत आढळला, या प्रकरणात 1 जानेवारीला डोनी गावातील दोघांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले, त्यांची चौकशीही सुरू होती मात्र राजू झोडे यांनी गावातील काही लोकांना भडकवीत क्षेत्रीय वनकर्मचारी यांना मारहाण करण्याची धमकी दिली, व पुढील कारवाई न व्हावी यासाठी शासकीय कामात अडथळा निर्माण करीत खोटी तक्रार दाखल केली.
नेहमी वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी यांना त्रास देण्याचे काम करणारे झोडे यांचेवर पोलीस कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात वनविभागातील कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारेल असा इशारा यावेळी देण्यात आला. Forest ranger association
यावेळी फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनचे चंद्रपूर अध्यक्ष बी.के.तुपे, व्ही.एस.राजूरकर, आर.जी.मुन, राहुल कारेकर व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.