प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मागील शासनाच्या कार्यकाळात खेडी गोंडपीपरी 80 की.मीटर मुख्य रस्त्याच्या कामाला 2018 ते 2020 कालावधीत मंजुरी देण्यात आली असून यासाठी 218 कोटी रुपयांचा निधीही SRK कंपनीला मंजूर करण्यात आला. काम करण्याचा कालावधी पूर्ण होऊनही रोडचे काम अजूनही अपूर्णच आहे. रोडचे दोन्ही साईड खोदून केवळ गिट्टी टाकून ठेवल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांचे बळी गेले आहेत. कित्येक जण गँभिर जखमी झाले आहेत. अजूनही अपघात होतच आहेत तरी देखील कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्यामुळे अशा contractor कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा.
आणि अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसदार यांना कंपनीने आर्थिक मदत करावी अशी मागणी नांदगाव ग्राम पंचायतिचे सरपंच हिमानी वाकुडकर यांनी केली आहे.
गेल्या 3 वर्षापासुन सुरू असलेल्या खेडी गोंडपिपरी रस्त्याचे काम अजुनही पुर्ण झालेले नाही यामुळे यारस्त्यावर अपघात होवून अनेक निरअपराध व्यक्तींचे जिव गेलेले आहे. यामध्ये दयाराम चौधरी,कोसंबी, पंकज तिवाडे नवेगाव(भू), संजय पाटील मारकवार राजगड, पवन चाफले करंजी यांचा बळी गेला. तर श्रीकृष्ण गेडाम व ठिकरे सर हे गँभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत आणि कित्येक किरकोळ जखमी झाले आहेत. अजूनही होत आहेत. हे कामाच्या दिरंगाईमुळेच झाले आहेत. त्यामुळे रस्ता अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियाना आर्थिक मदत करण्याची जबाबदारी दिरंगाई करणाऱ्या कंपनीवर आणि कंत्रातदारावर असल्याचा आरोपही महिला सरपंच हिमानी वाकुडकर, बोनडला सरपंच जालिंदर बांगरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, नवेगाव (भू) माजी सरपंच सुमित पाटील आरेकर, जुनसुरला ग्रा.पं. सदस्य गणेश खोब्रागडे, माजी सरपंच योगेश शेरकी यांनी मूल येथील विश्राम गृहात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
खेडी-गोंडपिपरी-पोळसा रस्त्याच्या रूंदीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी सुमारे 218 कोठी रूपयाची निवीदा काढण्यात आली होती, सदर काम हैदाबाद येथील srk company एस आर के कंपनीला मंजुर करण्यात आले होते. सदर कंपनीने पोळसा रोडवेज प्रा. लिमीटेड कंपनीला काम करण्यासाठी नेमणुक केली., मात्र सदर कंपनीने मागील 3 वर्षापासुन अतिशय दिरंगाईने हलगर्जीपणाने रस्त्याचे काम सुरू केले आहे, 2 वर्षात सदर काम पुर्ण करण्यासाठी कंपनी सोबत करारनामा करण्यात आलेला होता, मात्र तिन वर्षाचा कालावधी लोटुन गेला परंतु सदर रस्त्याचे 25 टक्केही काम पुर्ण झालेले नाही, संपुर्ण रस्त्याच्या काही अंतरावर सुमारे 116 सिडी वर्कचे काम घेण्यात आले. त्यातील फक्त पाच झाले आहेत. उर्वरित सी.डी. वर्क खोदून ठेवले आहेत. यामुळे वाहन चालकांना नाहक खूप त्रास सहन करावा लागत असून प्रसंगी किरकोळ अपघातही होत आहेत. Pwd chandrapur रस्त्याच्या कामावर पाहणी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मॅडम साखरवाडे व कार्यकारी अभियंता श्री. भास्करवार यांचेकडे आहे परंतु आम्हालाही कंपनीने दिवानजी सारखी वागणूक देत असल्याने आम्हीही हतबल असल्याचे मागणी करणाऱ्यांना सांगितले. एवढी मुजोरी कंपनी प्रशासन करीत आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुंग गिळून आहेत. यामुळेच आम्हाला नाइलाजाने न्यायालयाचा मार्ग स्विकारावा लागत असल्याची खंत हिमानी वाकुडकर यांनी यावेळी व्यक्त केली. रेंगाळत असलेले रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे अन्यथा रास्ता रोको व तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा हिमानी वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पत्रकार परिषदेला बोंडाळा खुर्दचे सरपंच जालिंदर बांगरे, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, जुनासुर्ला ग्राम पंचायतचे सदस्य गणेश खोब्रागडे, नवेगांव भुजलाचे माजी सरपंच सुमित आरेकर, बोंडाळा खुर्दचे माजी सरपंच योगेश शेरकी उपस्थित होते.