प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या सहा नगर पंचायतीच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस join congress पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत कांग्रेस पक्षाची मान उंचावली आहे. याचे पडसाद ग्रामीण कांग्रेस मधेही होऊ लागल्याने मुल तालुक्यातील मौजा विरई येथील शिवसेनेचे ग्राम पंचायत सदस्य अतुल गोवर्धन यांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या कार्यावर विश्वास ठेवत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षात प्रवेश केला. Cdcc bank president चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने रावत यांनी यावेळी अतुल गोवर्धन यांचा कांग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले. याप्रसंगी मुल तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नावार, कांग्रेसचे जेष्ठ सक्रिय कार्यकर्ते बंडूभाऊ गुरनुले,शहर कांग्रेसचे अध्यक्ष सुनील शेरकी, उपाध्यक्ष कैलास चलाख, आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
