गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना नगरपंचायत निवडणूकीच्या निकालाकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. 19 जानेवारीला समोर आलेल्या निकालात 17 जागांपैकी विजय बावणे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने तब्बल 12 जागा जिंकून पुन्हा एकदा दणदणीत विजय संपादन करत सत्ता काबीज केली आहे.भाजप,शेतकरी संघटना, शिवसेना व इतरच्या गटाला केवळ 5 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.काँग्रेस विरूद्ध सगळेच पक्ष एकत्रित आल्याने यंदा परिवर्तन निश्चित, असे चित्र दिसत असताना काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. "कहीं खुशी तो कहीं गम" अशी परिस्थिती येथील राजकीय गोट्यात पहायला मिळत असून या निवडणूकीत विजय संपादन करणारे व पराजित होणारे उमेदवार व पक्षाच्या नेत्यांनी मतदारांचा कौल स्विकारत आभार व्यक्त केले आहे.
