प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या नागपूर विभागाच्या उपाध्यक्ष सौ. तेजस्विनी नागोशे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि त्यांची नियमितता व जिल्हा संघटक तालुका संघटक यांचेशी नियमितपणे असलेला समनव्य सोबतच नागपूर विभागात राबविले नेफडोचे अनेक कौतुकास्पद उपक्रमाबाबत उल्लेखनीय कामगिरी असल्याने त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा पदावर पदोन्नती करण्यात आली. याबद्दल ऐका नियोजन सभेत तेजस्विनी नागोशे यांचे अभिनंदन केले. असून पदोन्नती बाबत सौ. तेजस्विनी नागोसे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश अध्यक्ष यांचे जाहीर आभार मानतांना ही पदोन्नती माझी नसून सर्व माझ्या सहकारी सभासदांचा सन्मान असल्याचेही बोलून दाखविले आहे. याबद्दल नागपूर विभाग सचिव रत्ना चौधरी, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा ललिता मुस्कावार सल्लागार प्रा. रत्नमाला भोयर, जिल्हा सचिव सुषमा कुंठावार, चंद्रपूर जिल्हा संघटिका कविता मोहुर्ले, ज़िल्हा संघटक श्रीरंग नागोसे, गुरुदास चौधरी, मूल तालुका अध्यक्षा मीरा शेंडे, उपाध्यक्ष अल्का राजमालवार, तालुका सचिव गोंगले मॅडम, तालुका संघटक गुरु गुरनुले, पोंभुरणा तालूका प्रमुख संजय नागुलवार, मुल तालुका संघटिका शशिकला गावतुरे, नंदा शेंडे, वंदना गुरनुले, इंदू मांदाडे, मेश्राम मॅडम, मोहुर्ले मॅडम, वाढई मॅडम, गौरी चौधरी, राकेश ठाकरे यांचेसह नागपूर विभागाचे पदाधिकारी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी तेजस्विनी नागोशे यांचे अभिनंदन केले आहे.
