गडचांदूर :- औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथे गेल्या वर्षभरापासून ओपनस्पेस सौंदर्यीकरण, नाली बांधकाम अशी विविध विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहे.मात्र ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याची बोंब नागरिकांडून होत असून स्थानिक नगरपरिषद अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करून अघोषित चुप्पी साधल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.यामुळे याठिकाणी संबंधित कंत्राटदाराची मनमानी सुरू असून शहर विकासाच्या नावाखाली अक्षरशः जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे. drain construction
असे असताना शहरात हल्ली सुरू असलेले नालीचे बांधकाम कुठेही अंदाजपत्रकानुसार होत नसून नगरपरिषद अभियंता जाणूनबुजून तर याकडे दुर्लक्ष करीत नाही ना ? अशी शंका व्यक्त करत सदर कामाला निकृष्ट दर्जाच्या उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल अशी टीका भाजयुमो तालुकाध्यक्ष रोहन रमेश काकडे यांनी केली आहे. आपण सगळेच भारतीय आहोत आणि होत असलेला भ्रष्टाचार थांबविणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.याची आठवण करून देत शहरात सुरू असलेल्या नाली बांधकामाची सविस्तर व निष्पक्ष चौकशी करावी,दोषींवर आढळल्यास कारवाई करावी अशी मागणी वजा विनंती काकडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.सोबतच क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे,माजी मंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच गडचांदूर न.प.मुख्याधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. Poor quality
दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काकडे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून यामध्ये सदर प्रकरणी आपल्या स्तरावरून तपास करून नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करावी आणि कार्यवाहीची रूपरेषा मला कळवल्यास मी आपला आभारी राहील असे नमूद करत योग्य कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.आता याप्रकरणी चौकशी होवुन दोषींवर कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.