भद्रावती - जिल्ह्यातील कोंबडा बाजार उठला असला तरी काही भागात लपून हे बाजार सुरू आहे, मात्र पोलिसांच्या नजरेस सर्व काही दिसतंच.
भद्रावती तालुक्यात 2 कोंबडा बाजारावर भद्रावती पोलिसांनी धाड मारीत 10 कोंबडे बहाद्दरांना अटक केली, दोन्ही कारवाईत 1 लाख 61 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Police raid
स्थानिक गुन्हे शोध पथकाला खबरी तर्फे तालुक्यात मौजा चिरादेवी येथील गावलगतच्या झुडपी जंगलात काही इसम कोंबड्यांच्या पायाला काती लावीत आपसात लढवीत त्यांच्यावर पैसे लावीत आहे.
पोलिसांनी सापळा रचत त्या कोंबडा बाजारावर धाड मारली, त्याठिकाणी 7 जणांना अटक करण्यात आली व 1 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Gambling Act
दुसऱ्या कारवाईत मौजा मांगली येथे कोंबड्याना आपसात लढवीत त्यांच्यावर पैसे लावत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाल्यावर पोलीस स्टाफ सह त्याठिकाणी धाड मारण्यात आली.
त्याठिकाणी 3 जणांना अटक करीत 49 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोन्ही कारवाईत कलम 12 ब मजुका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
Cock market
सदरची कार्यवाही मा. अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सा., उप वि. पोलीस अधिकारी सांगळे सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. गोपाल भारती, पोउपनि गजानन तेलरांधे, पोशि शंशांक बदामवार, जगदीश झाडे, निलेश ढेंगे, अजय झाडे, रोहीत चिटगीरे, विश्वनाथ चुदरी, यांनी केली.