घुग्घुस - बुधवार 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता येथील गांधी चौकात भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना मी मारू शकतो आणि शिव्या ही देऊ शकतो असे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या नाना पटोलेंचा जाहीर निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
Burning of Nana Patole's statue
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. नाना पटोले यांनी दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना “आता आपली ताकद वाढली असून, आपण पंतप्रधान मोदी यांना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो.” अशा वल्गना करत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. Offensive statement
याचा निषेध करण्यासाठी घुग्घुस भाजपातर्फे नाना पटोले यांचा जाहीर निषेध करून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पटोले मुर्दाबाद, अटक करा अटक करा नाना पटोले यांना अटक करा, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हाय हाय, नाना पटोले यांचा निषेध असो अशी प्रचंड नारेबाजी व घोषणा बाजी करण्यात आली. Nana patole
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, काँग्रेसची विकृत मानसिकता नाना पटोलेंच्या अशा बेताल वक्तव्यावरून पून्हा एकदा सिद्ध झाले आहे. नाना पटोले यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अर्वाच्य भाषेत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना शिवीगाळ केली या घटनेचा भाजपा निषेध करते तसेच भाजपातर्फे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांत नाना पटोले यांच्या विरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान देशाचे असतात त्यांचे स्थान सर्वोच्च आहे त्यांचा सन्मान प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. नाना पटोले यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.
नाना पटोलेंवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. असेही ते म्हणाले.
यावेळी माजी जि. प. सभापती नितुताई चौधरी, उत्तर भारतीय आघाडीचे संजय तिवारी, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, महेश लठ्ठा, वैशाली ढवस, निळा चिवंडे, भाजपाचे रत्नेश सिंग, शाम आगदारी, निरंजन डंभारे, अनंता बहादे, मोमीन शेख, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, दिलीप कांबळे, अनिल मंत्रिवार, विकास बारसागडे, वमशी महाकाली, तुलसीदास ढवस, मंगेश पचारे, सतीश कामतवार, सुशील डांगे, अरुण दामेर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
