चंद्रपूर - मागील 2 वर्षांपासून देशात कोरोनाच्या सावटाखाली मानवी जीवन दहशतीखाली जगत आहे.
कोरोनाच्या 2 लाटेनंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल झाले होते मात्र 2022 या नवीन वर्षातील पहिल्या आठवड्यात कोरोनाचा उद्रेक झाला, पुन्हा देशात व राज्यात निर्बंध लागू करण्यात आले मात्र यंदा पर्यटन क्षेत्रही covid restrictions निर्बंधांच्या नावाखाली बंद करण्यात आले, पर्यटन क्षेत्रात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करीत सुरू करायला हवे होते, कोरोनाच्या उपाययोजना करताना महाविकास आघाडी चे नियोजन चुकले अशी टीका करीत राज्यातील एकमेव कांग्रेस खासदाराने आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला. Congress mp dhanorkar
कोविडच्या नियोजनात आजही केंद्र असो की राज्य सरकार यांच्याजवळ ठोस उपाययोजना नाही, यामुळे केंद्र व राज्य सरकार कोरोना विषाणूचा सामना करण्यात अपयशी ठरले अशी टीका कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. Tourism
मागील 2 वर्षांपासून सतत सुरू असलेले निर्बंध बघता पर्यटन क्षेत्राशी संबंधित कर्मचारी असो की रोजंदारी मजूर यांच्या व्यवसायावर या निर्बंधांमुळे गदा आली आहे. Mahavikas aghadi
निदान या कोविड निर्बंधात सरकारने काही प्रमाणात शिथिलता आणत पर्यटन क्षेत्र सुरू करावे याबाबत खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. कारण इतर राज्यातील पर्यटन क्षेत्र हे निर्बंधांत शिथिलता देत सुरू करण्यात आले मात्र महाराष्ट्र राज्यात कोविड निर्बंध लावीत सदर क्षेत्र बंद केल्याने खासदार धानोरकर यांनी या निर्णयावर आपली नाराजी दर्शविली.
