चंद्रपूर - कोरोना 2 वर्षाचा झाला असला तरी यावर ठोस उपाययोजना आजवर का झाल्या नाही? असा संतप्त प्रश्न कांग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी उपस्थित केला. Booster dose
वॅक्सिन च्या नावाखाली आता बूस्टर डोज नागरिकांना घेण्यासाठी सांगण्यात येत आहे, आयुष्यभर नागरिक बूस्टर डोजच घेत राहणार काय? सरकार यावर उपाययोजना का करीत नाही, आजही निर्बंधांच्या नावाखाली नागरिक पूर्णपणे संभ्रमात आहे. Covid vaccine
कोरोनावर ठोस उपाय करण्याऐवजी प्लाज्मा थेरपी काढण्यात आली मात्र ती सुद्धा फेल ठरली, लसीकरणाचा अवधी वाढविण्यात आला, दुसरा व आता तिसरा डोज नागरिकांना द्यायचा असेल तर नेमका किती अवधी द्यावा यामध्ये सरकारही संभ्रमात आहे. Lockdown
निर्बंधांच्या नावाखाली शाळा वारंवार बंद करण्यात आल्या, यामुळे पालकवर्ग संभ्रमात आला असून आपल्या मुलांचे शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न पालकांना पडला आहे.
कोरोना आला आणि नागरिकांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले, उपाययोजना करण्याच्या नावाखाली केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले अशी घनघणाती टीका कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
