ब्रम्हपुरी:- नगरपंचायत निवडणुकीच्या धुमाकुळात ब्रह्मपुरी शहरातून धक्कादायक बाब पुढे आली आहे.
शहरातील टिळक नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने थेट पोलीस शिपायावर बलात्काराचा आरोप करीत खळबळ माजवून दिली आहे.
आरोपी पोलीस शिपाई हा पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे, ब्रह्मपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी 51 वर्षीय लालश्याम बाबुराव मेश्राम ला अटक केली आहे. Rape
फिर्यादी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लालश्याम मेश्राम यांच्या विरोधात कलम अप क्र.३०/२०२२ भारतीय दंड संहिताचे कलम३७६(२)(n)३४५(d)(१) ५००, ५०६ भादवी सह कलम ६७(अ)माहीती व तंत्रज्ञान अधिनीयम २०००चे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Chandrapur police
याआधी सुद्धा रामनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपायावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता, आता पुन्हा पोलीस कर्मचाऱ्यांवर हा आरोप झाल्याने पोलीस विभागाची चांगलीच बदनामी होत आहे. raped by police constable
