प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मुल येथें महाराष्ट्राचे ex-chife minister माजी मुख्यमंत्री स्व.दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष एड.बाबासाहेब वासाडे यांच्या अध्यक्षतेखाली covid 19 कोविड-19 नियमांचे पालन करून कर्मवीर परिसरात असलेल्या कर्मवीर कन्नमवार यांच्या प्रतिमेला संचालक प्राध्यापक, कर्मचारी यांनी मालार्पण करुन अभिवादन केले. कन्नमवार जयंती निमित्य दरवर्षीच आंतर महाविद्यालयीन स्पर्धा घेत असतो परंतु कोविड-१९ मुळे शक्य झाले नाही तरी पण गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अभ्यासक्रमा नुसार बी ए भाग तीनच्या ५व्या सेमला संशोधन पद्धती हा विषय असल्याने या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत संशिधान प्रक्रिया अहवाल कसा तयार करायचा यावर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रवीण उपरे, प्रा. गणपत आगलावे, प्रा गजानन घुमडे, प्रा.डॉ. गणेश गायकवाड, प्रा.गुरले मॅडम, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी संशोधन म्हणजे काय हे सांगून मराठी साहित्यात संशोधनाची प्रक्रिया कशी संशोधन करतांना कोणत्या टप्याने जावे व मराठी विषयाचा प्रकल्प अहवाल कसा करायचा यावर मार्गदर्शनामधून समजावून सांगितले. पदवी प्राप्त झालेला विद्यार्थी उच्च शिक्षण घेतांना पुढे त्याला येणाऱ्या अडचणींवर मार्ग शोधता यावा व संशोधन कार्यात युवकांचा सहभाग वाढवा अशी माहिती या कार्यशाळेच्या निमित्ताने डॉ.वाळके प्राचार्य यांनी दिली. कार्यशाळेला अनेक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करन्यासाठी विषय देण्यात आला. स्व.कन्नमवार यांना अभिवादन करतांना प्रा. किसन वासाडे, डॉ. संदीप मांडवगडे,डॉ.उज्वला कापगते, डॉ. विभावरी हाते, प्रा दिनेश बनकर, प्रा.डोंगरवार, प्रकाश चौखुंडे व विद्यार्थी उपस्थित होते.
