गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषदची 9 डिसेंबर 2021 रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती.त्यामध्ये इतर विषयांसह 14 वा विषय स्थलांतरित देशी दारू दुकानाचा होता.यावर विचार विनियम करून निर्णय घेतला जाणार होता.मात्र त्यादिवशी कांग्रेसचे दोन नगरसेवक अनुपस्थित असल्याने ठरावाला बहुमत कमी पडेल कदाचित या भितीने 10 विषय घेऊन नगराध्यक्षांनी सदर सभा अचानकपणे तहकुब केल्याचे विरोधी नगरसेवकांचे म्हणणे होते.ती तहकुब सभा 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली.या सभेत सर्व सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आवर्जून हजेरी लावली.सभे दरम्यान अनेक घडामोडी घडल्या.दारूच्या विषयावर विरोधी नगरसेवकांचा विरोध व आक्रमक भूमिका लक्षात घेत गुप्त मतदान घेण्यात आले.यामध्ये दारू दुकानाच्या समर्थनार्थ 6 आणि विरोधात 11 व 1 मत अवैध ठरल्याने दारू दुकानाचा ठराव नामंजूर करण्यात आला. Liquor store permission
सविस्तर असे की गडचांदूर नगरपरिषदेत कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसची सत्ता आहे.यापूर्वी सुद्धा लांजेकर यांच्या स्थलांतरित देशी दारू दुकानासाठी विशेष सभा बोलावण्यात आली आणि विरोधी नगरसेवक व नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर बहुमताने ठराव मंजूर करून ना-हरकत देण्यात आले.मात्र या दुसऱ्या नवीन दुकानाबाबत काही कारणाने सत्ताधाऱ्यांमध्ये वादविवाद व नाराजी होती.त्यामुळे याला ना-हरकत देण्यासाठी पूर्वी पासूनच यांच्यात एकमत नसल्यामुळे 9 डिसेंबरची सभा तहकूब करावी लागली असे विरोधी नगरसेवकांचे म्हणणे आहे.10 जानेवारी रोजी सभा घेण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले व त्यांनी आपापल्या नगरसेवकांची ठरावाच्या बाजूने राहण्यास सांगितल्याची माहिती आहे.असे असताना शेवटी विरोधी नगरसेवकांनी सभेत सदर ठरावाला मंजूर होऊ दिले नाही हे मात्र विशेष.या नवीन दारू दुकानाला विरोध दर्शवण्यासाठी सभेच्या दिवशी संबंधित परिसरातील महिला स्थानिक नगरपरिषद समोर ठिय्या मांडून बसले होते.ठराव नामंजूर झाल्यानंतर महिलांनी या विषयी समाधान व्यक्त करत दारूच्या विरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांचे आभार मानले आहे.काही का असेना शेवटी बहुचर्चित या विषयाला पूर्णविराम मिळाला असून "विरोध झाला मोठा,पैसा झाला खोटा" अशी उपहासात्मक चर्चा सध्या शहरात ऐकायला मिळत आहे.
