प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - ओरिसा वरून करीमनगर येथे कामानिमित्त चारचाकी कारणे जात असताना वाहन क्रमांक OD 03 M3197 ही गाडी मुल तालुक्यातील मुल वरुन गडचिरोली मार्गाच्या मुख्य हायवेने जात असताना आकापूर वळणावर चारचाकी कार पलटी झाल्याने कार मधील एक महिला ठार झाली असून बाकी 11 जण जखमी झाल्याची घटना मंगळवारच्या पहाटे चार वाजेदरम्यान घडली. चंद्रपूर-गडचिरोली national highway राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु असून काम पूर्णत्वाच्या मार्गावर आलेले आहे. परंतु आकापूर वळणावर तेव्हाच रिप्लेकटर लावणे अत्यावश्यक होते परंतु त्या ठिकाणी अजूनही रिपलेक्टर लावण्यात आले नसल्याने रस्ता माहीत नसलेल्या वाहन चालकांना रात्रोच्या वेळेस वळण असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच नेमका आकापूर वळणावरच हा huge accident भीषण अपघात घडला आहे. ओरिसा कडून करीमनगर कडे कारणे जात असताना कामगार असलेले वाहन पलटी खाल्याने ओरिसा येथील एक कामगार महिला वाहनांमध्ये दबून जागीच ठार झाली. तर उर्वरित 11 गंभीर जखमी झाले असून जखमी कामगारांना तात्काळ मुल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.