चंद्रपुर : जनता शिक्षण महाविद्यालय व जनता महाविद्यालयात आज (दि.२६) ला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जनता शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे व जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. Republic day
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर अल्लेवार, महाविद्यालयातील जेष्ट प्राध्यापक डॉ. संजय बरडे, डॉ. गणेशकुमार पेटकर, डॉ. राजेश पत्तीवार, डॉ. शिवराम सातपुते, डॉ. आशीष महातळे, डॉ. कुंदन पाटील, प्रा. बोढाले, प्रा. कविता रंगारी, ग्रंथपाल प्रा. विजय मालेकर, प्रा. नितिन कुकडे, रजिस्ट्रार संजय रंगारी, दिनकर अडबाले, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी राजेंद्र जुमडे, संदीप माशिरकर, नामदेव नन्नावरे, अमीत अत्तरकर, ओंकारनाथ सोणी, राहुल देशमुख, देवराव कींगरे, किशोर धनविजय, मनिष यादव, बालाजी जिवतोडे, राजु चामाटे, अशोक गेडाम, बाळकृष्ण मोडक, जितेंद्र केराम, तसेच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 26 January
यावेळी एन.सी.सी. तर्फे परेड सादर करण्यात आली.
सदर कार्यक्रम कोविड-१९ च्या नियमावलीचे पालन करुन साजरा करण्यात आला.