बल्लारपूर - चंद्रपूर वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयात 1 कोटी 63 लाख 95 हजार 507 रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी Forest Development Corporation वनविकास महामंडळाचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल नरहर वाघ याला 5 जानेवारीला येथील आर्थिक गुन्हे शाखेने नागपुरातून अटक केल्या नंतर बुधवार(12 जानेवारी)ला रात्री या प्रकरणी Forest Guard फॉरेस्ट गार्ड जितेंद्र मडावी याला अटक केली आहे. न्यायालयाने जितेंद्र मडावी यास 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
कन्हाळगाव वन परिक्षेत्रात सागवान व बांबूच्या कटाईसाठी बोगस मजूर दाखवून शासनाची सुमारे तीन वर्ष लूट केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.सन 2015-16 व 2026-17 या दोन आर्थिक वर्षांत वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयांतर्गत कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात सागवान कटाई व बांबू निष्कासनाची कामे करण्यात आली. यासाठी प्रत्यक्ष कामावर लावलेल्या मजुरांपेक्षा अधिक मजूर दाखविण्यात येत होते. तसेच कटाई अधिक मालाची दाखवून विक्रीकरिता कमी माल पाठवून शासनाला चुना लावण्याचे काम सुरू होते.या आशयाची तक्रार विद्यमान विभागीय व्यवस्थापक पाठक यांनी 17 ऑक्टोबर 2021 ला केली होती.या प्रकरणी पोलिसांनी वाघ यांना 5 जानेवारीला अटक केली, न्यायालयाने त्यांना 13 जानेवारी पर्यंत 8 दिवसाची police custody पोलीस कोठडी सुनावली होती.आरोपी वाघ यांना गुरुवार(13जानेवारी)ला न्यायालयात हजर करण्यात आल्या नंतर,न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Forest scam
मडावी तयार करत होता बोगस चलान...देशमुख
वाघ यांच्या कार्यकाळात केलेल्या सर्व कामांची कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली.त्याची छाननी सुरू आहे.वनउपज उत्पादनाची चालान व बँकेतून मजुरांना देण्यासाठी काढलेली रकम याची तपासणी सुरू आहे.त्यामुळे नेमके किती मजूर त्यांनी बोगस दाखविले हे अभ्यासाअंती स्पष्ट होणार आहे.ब्रम्हपुरी वनपरीक्षेत्र अंतर्गत कार्यरत फॉरेस्ट गार्ड जितेंद्र मडावी बोगस चालान तयार करीत होता म्हणून त्याला अटक करण्यात आली,अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख दिली आहे.
